*MSIDC विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी न आल्याने आमरण उपोषणाचा ईशारा देत तूर्तास आंदोलन थांबविले*. *आठ दिवस रस्त्याचे काम बंद राहणार*
मूल – कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या जानाळा–पोंभूर्णा मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे जानाळा, कांतापेठ,चिरोली,सुशी, ग्राम पंचायत सरपंच यांनी अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नागपूर यांचेकडे दिनांक २१ मे २०२६ रोजी लेखी तक्रार दाखल केली. यावर कार्यकारी अभियंता मा. वंजारी मॅडम यांनी मी स्वतः रस्त्याच्या साईडवर काम दुरुस्त करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.परंतु २० दिवसाचा कालावधी संपूनही वंजारी मॅडम आल्या नाही.आणि कामातही सुधारणा नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या समस्यांची दाखल घेऊन तालुका काँग्रेस मूलच्या वतीने मंगळवारी सकाळी ९ वाजता कांतापेठ येथे रास्तारोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्क कडक पोलिस बंदोबस्त, दंगा पथक दोन गाड्या तैनात होत्या. रस्ते व नाली बांधकामातील गंभीर त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधित प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी आपल्या तीव्र शब्दात व्यक्त केला. कडक उन्हात दोन तास चाललेल्या आंदोलनाचा धसका पोलिस प्रशासनाने घेऊन रस्ता बांधकामाचे मुख्य कंत्राटदार श्री. गुरुबक्षणी यांचेशी संपर्क साधला असता त्यांचे वतीने जतिन मिश्रा तात्काळ हजर झाले. त्यांना कामही दाखविण्यात आले. मिश्राने झालेल्या चुका मान्य करीत एक हमी पत्र लिहून दिले. “*हमीपत्र* ” “*मी जतिन मिश्रा रस्ता कंत्राटदाराचे प्रतिनिधी म्हणून हमी पत्र लिहून देतो की, बांधकामातील त्रुटी दूर करून सर्व समस्या ८ दिवसात पूर्ण करून देण्यात येईल,व मुख्य कार्यकारी अभियंता वंजारी मॅडम यांचे सोबत काँग्रेस पदाधिकारी व पोलिस प्रशासनाचे अधिकारी यांचेशी तोडगा काढण्यात येईल. तोपर्यंत रस्त्याचे पूर्ण काम स्थगित ठेवण्यात येईल. असे हमीपत्र मी पोलिस प्रशासनासमोर काँग्रेसच्या आंदोलन कर्त्यांना दिनांक ९ जून २०२६ रोजी लिहून देत आहे*”
सिमेंट काँक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सुरुवातीपासूनच कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्यांची उंची रस्त्याच्या व घरांच्या पातळीपेक्षा अधिक असल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील अनेक कुटुंबांपुढे आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बांधकामातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले. रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे अपेक्षित असताना तेथे माती टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सिमेंट काँक्रीट रस्त्याला मजबुती मिळण्यासाठी नियमानुसार २८ दिवस पाणी मारणे आवश्यक असताना केवळ ५ ते ७ दिवसच पाणी मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरील काँक्रीट उखडू लागले असून गिट्टी बाहेर पडत आहे. दुसरीकडे नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यांनाही तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
*आंदोलन कर्त्यांचा उपोषणाचा इशारा* दिलेल्या हमीपत्र नुसार नागरिकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास उपोषण करण्यात येईल असा ईशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.एवढेच नव्हेतर येणाऱ्या अधिवेशनात रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न उपस्थीत केला जाईल असेही सांगितले.
आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, नगराध्यक्ष एकता समर्थ, काँग्रेस तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, शहराध्यक्ष सुनील शेरकी,बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, सरपंच दर्शना किन्नाके,वैशाली निकोडे,अनिल सोनुले, सदस्य धनराज रामटेके, राजू वाढई, घनश्याम येनुरकर, राजू मारकवार, पवन नीलमवार, सौरभ वाढई, प्रशांत उराडे, बंडू गुरनुले, नगरसेवक लीना फुलझेले, इंटइचे अध्यक्ष दत्तू समर्थ, सरपंच राहुल मुरकुटे,भास्कर खोब्रागडे, केमेकर, किशोर घडसे,नलिनी आडपवार, विलास कागदेलवार, विवेक मूत्यलवार, अतुल गोवर्धन,चाहूल प्रेमळवार, डेव्हिड खोब्रागडे, चंदु चटारे, रुपाली संतोषवार, ऋतिक गोयल, दुर्वास कळसकर, ज्योती चटारे,काजल धारणे, समीक्षा कळसकर, कामडे ताई, गणेश मेश्राम, कृष्णा बोरेवार,यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते कांतापेठ, चिरोली, जानाळा,सुशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




