Friday, June 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedअखेर खाईल तो खाल्या पाहील, काँग्रेस पक्षाने विधान परिषद उमेदवार शैलेश अग्रवाल...

अखेर खाईल तो खाल्या पाहील, काँग्रेस पक्षाने विधान परिषद उमेदवार शैलेश अग्रवाल यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले तात्काळ निलंबीत

*काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या शैलेश अग्रवाल यांना केले निलंबीत*. मूल – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषद मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वर्धा येथील व्यावसायिक व शेतकरी संघटनेत काम करणारे युवा नेतृत्व म्हणून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा अध्यक्ष संदीप गिऱ्हे, राका शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, व जिल्ह्यातील अनेक नगराध्यक्ष, नगर सेवक, काँग्रेसचे असंख पदाधिकारी यांचे उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. सर्व नेत्यांनी शैलेश अग्रवाल यांचे अभिनंदन करून शुभेछ्या दिल्या. शैलेश अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त करतांना आमदार भांगडिया यांना उद्देशून अशा भानगडींना मी कधीही घाबरणार नाही,असा उपरोधिक टोला दिला. व त्याच दिवशी सर्वांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. परंतु अर्ज भरला त्यादिवसापासून शैलेश अग्रवाल गायबच राहिले. आणि अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मात्र कुणीही काँग्रेस नेता सोबत नसताना स्वतःच जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजप उमेदवार यांचा विजय निश्चित केला. त्यामुळे सर्वाधिक मते राहूनही अखेर निवडणूक न लढता काँग्रेसचा पराभव झाला. अशी चर्चा सर्वत्र पसरली. याचा अर्थ शैलेश अग्रवाल यांनी कुणाकडून रसद घेतली. अशी शंका मतदार असलेल्या विधानसभा क्षेत्रातील असंख्य नगर सेवक व नगराध्यक्ष यांचेकडून केली जात आहे. नगर परिषदेची निवडणुक झाल्यानंतर प्रथमच विधान परिषदेची निवडणूक लागल्याने अनेक नगर सेवक आमचा निवडणुकीचा खर्च निघेल ही आशा ठेवली होती.परंतु काँग्रेसचा उमेदवारच खाईल तो खाल्या पाहील अशी भूमिका घेतल्याने नगर सेवकांचां हिरमोड झाला. अशा कृतीमुळे प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ जून २०२६ रोजी प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांच्या आदेशान्वये शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षातून तात्काळ निलंबीत करुन सदस्यत्व रद्द केले आहे.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News