Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भरोषावरच मी आमदार झालो. आमदार...

संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भरोषावरच मी आमदार झालो. आमदार अभिजित वंजारी. (SIR)मतदार पुनर्निरीक्षण बाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागृत राहावे.- संतोषसिंह रावत.

*संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानेच मी पदवीधर आमदार झालो – आमदार अभिजित वंजारी* मूल – गेल्या अनेक वर्षापासून भाजपाच्या नेतृत्वात पदवीधर मतदार संघाचा आमदार निवडून यायचा परंतु मागील निवडणुकीत बल्लारपूर विधानसभेचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ रावत यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन भरपूर मतांचा आशीर्वाद दिल्याने मी पदवीधर मतदार संघातून आमदार झालो. असाच प्रेम व आशीर्वाद नोव्हेंबर २०२६ च्या होणाऱ्या निवडणुकीत द्यावा. अजूनही आक्तोंबर २०२३ च्या पूर्वीचे पदवीधर असतील त्यांची नोंदणी करुन घ्यावी अशी विनंती उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमदार अभिजित वंजारी यांनी केली. गेल्या ३५ वर्षापासून आम्हाला आमदार,खासदार नसताना सुद्धा काँग्रेस जिवंत ठेवली.म्हणूनच नगर परिषद,ग्रामपंचायत,बाजार समिती,सहकारी सोसायटी अशा स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केली.जर विधान सभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या विधानसभा क्षेत्रात आपण लक्ष दिले असते तर काँग्रेस हरली नसती.यासाठी कार्यकर्त्या मतदारांनी केलेल्या मागणीकडे लक्ष देऊन सहकार्य करावे,असे अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ,गटनेते उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनीही आपल्या मनोगतामधून आमदार महोदय यांचेकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले.संचालन शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले तर आभार महिला अध्यक्षा नलिनी आडपवार यांनी मानले. – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – *मतदार यादी पुनर्निरीक्षण(SIR) बाबत कार्यकर्त्यांनी जागृत राहावे* — *संतोषसिंह रावत* सद्यस्थितीत कोणत्याही निवडणुकीत बाहेरचे मतदार आणून सत्ता काबीज केले जात आहे.यासाठी निवडणूक आयोगाने (SIR) कार्यक्रम सुरु करणार आहे. यामध्ये २००२ च्या यादीत ज्या मतदारांचे नाव आहेत ते सुद्धा रद्द केले जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.यासाठी पुढील कोणतीही निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर प्रत्येकांनी स्वतःजबाबदरी घेऊन चुकीचे मतदार नोंदणी,जुन्या मतदारांचे निष्कसन,नवीन नाव नोंदणी, याबाबत जागृत राहून आपले मतदार रद्द केल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी,असे आव्हान प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी सर्व उपस्थिताना केले. यासाठी नगर सेवकांनी आपल्या प्रभागात आपलाच (BLA) मतदान प्रतिनिधी नेमून आपल्या मतदारांची खात्री करुन घ्यावी.व शासनाच्या (BLO) कडून मतदार यादी पुनर्निरीक्षण बरोबर होत आहे किंवा नाही.होत नसल्यास तात्काळ हरकत घ्यावी लागणार आहे.याबाबतचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले दिशा निर्देश,मार्गदर्शन आपल्या पक्षाचे तालुका व शहर प्रमुख यांचेकडून आपणास दिले जातील. यासाठी (BLA) नियुक्तीचे फॉर्म तालुका काँग्रेस कार्यालयातून लगेच घ्यावे व ते आपल्या माहितीसह फोटो लाऊन त्वरित भरुन द्यावे. असे आव्हान सुद्धा या बैठकीमध्ये देण्यात आले. या बैठकीला सोसायटी अध्यक्ष घनश्याम येनुरकर, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार, धनंजय चिंतावार,प्रा.किसान वासाडे,संचालक किशोर घडसे,नगर सेवक बंडू गुरनुले, गुरुदास चौधरी,महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार,विलास कागदेलवार,नितीन गद्देवार,लीना फुलझेले,ऋतिक गोयल,अशोक येरमे,अनेक संचालक, न.प.सभापती,नगरसेवक,ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी,महिला काँग्रेस पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News