Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*आज दुपारी आलेल्या तुफान चक्री वादळात राजोली येथील टीनाचे शेड पडल्याने प्रशांत...

*आज दुपारी आलेल्या तुफान चक्री वादळात राजोली येथील टीनाचे शेड पडल्याने प्रशांत शेणमारे यांचा जागीच मृत्यू. वादळाने रस्त्यावर झाड पडल्याने राजोली रस्ता बंद*

*दुपारी आलेल्या तुफान चक्री वादळात राजोली येथील शेड पडल्याने प्रशांत शेणमरे यांचा जागीच मृत्यू*. *वादळाने रस्त्यावर झाडे पडल्याने राजोली मूल रस्ता बंद* मूल – आज दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान आलेल्या आकस्मिक तुफान चक्री वादळामुळे राजोली येथील प्रशांत डोनुजी शेणमारे वय (४५) यांचेवर नुकतेच बांधण्यात आलेला सिमेंट विटाचा शेड पडल्याने शेड खाली दबून प्रशांत शेणमारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आज मंगळवार दिनांक 4 एप्रिल २०२६ रोजी दुपारी तीव्र ऊन असतांना अचानक तुफान चक्री वादळ व गारासह पाऊस आला. तुफान वादळ इतका जोरदार असल्याने राजोली येथील रहिवाशी प्रशांत शेणमारे यांनी राजोली रेल्वे स्टेशन जवळ आपल्या शेतात सिमेंटच्या विटांचा व्यवसाय सुरु केला असल्याने त्यासाठी शेड बांधकाम केला होता. तुफान वादळ आला तेव्हा प्रशांत हा शेड खाली सहारा घेतला तेव्हाच अचानक चक्री तुफान वादळामुळे शेड प्रशांतच्या अंगावर पडल्याने तो तिथेच जागेवर शेडखाली दबून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मोका चौकशी व पंचनामा करुन मृतकाचे प्रेत शव विचेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे हलविण्यात आले. मृतक प्रशांत यांना पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. प्रशांतच्या मृत्यूमुळे संपूर्ण राजोली गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. झालेल्या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत. *राजोली मूल रस्ता बंद*. दुपारी झालेल्या आकस्मिक तुफान चक्री वादळामुळे राजोली मूल रस्त्यावरील झाडे पडल्याने झाडाखाली एक चारचाकी कार दबली. कारचा बराच नुकसान झाल्याचे समजले असून दुपारी ३.३० वाजता पासून रस्ता बंद झाला असल्याने जाणारी येणारी वाहतूक अडली आहे.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News