Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*लहान बाळगोपालांच्या कला व सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तान्हा पोळ्याचे आयोजन*. *बैल...

*लहान बाळगोपालांच्या कला व सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तान्हा पोळ्याचे आयोजन*. *बैल हा आपल्या घरातील सदस्य आहे. त्याची जपणूक केली पाहिजे*- *संतोषसिंह रावत*

*लहान बाळगोपालांच्या कला व सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तान्हा पोळ्याचे आयोजन*. *बैल हा आपल्या घरातील सदस्य आहे. त्याची जपणूक केली पाहिजे*-
*संतोषसिंह रावत*
मूल – कष्टकरी शेतकऱ्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी बैल पोळा व लहान मुलांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित करणारा तान्हा पोळ्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणेच संतोषभाऊ रावत मित्र परिवार द्वारा आयोजित, युवाशक्ती क्रीडा मंडळ व श्री. माँ.दुर्गा मंदिर मूल यांच्या सहकार्याने गांधी चौक, मूल येथे करण्यात आले.
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने लहान मुले सकाळपासूनच आपल्या नंदीच्या सजावटीत व्यस्त होती. ‘आपला नंदी – इतरांपेक्षा कसा वेगळा आणि सुंदर दिसेल यासाठी चिमुकल्यांनी नंदीला आकर्षक सजावट केली.

चिमुकल्यांचा उत्साह, नंदीची आकर्षक सजावट आणि पारंपरिक वातावरणामुळे तान्हा पोळ्याला विशेष रंगत आली.
गांधी चौक,गुजरी चौक,चंद्रपूर रोड मूल येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुनी परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या या सणाच्या माध्यमातून लहान मुलांना आनंद,शहरातील तान्ह्या पोळ्याच्या उत्सवात पारंपरिक नंदीबैलांसोबतच अनेक समाजप्रबोधनपर देखावे, धार्मिक संस्कृती पाहायला मिळाले. यात एका चिमुकल्याने कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची केलेली वेशभूषा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. या बालकाने हातातील फलकांद्वारे थेट भ्रष्टाचारावर प्रहार केला ‘ना कुणाचा दबाव, ना कुणाची भीती… नियम आणि कायदा हीच नीती’, तसेच ‘हा तान्हा पोळा केवळ लाकडी बैलांची पूजा नसून कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान आहे,’अशा परखड संदेशांनी उपस्थितांची मने जिंकली. या ‘छोट्या आयएएस’ च्या भूमिकेचे समाज प्रबोधनात्मक संकल्पनेतून हजारो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. माँ.महाकाली,उभा विठोबा विटेवरी,श्रावण बाळाची भूमिका, शेतकऱ्यांवर दुष्काळ,
नंदीबैलांच्या सजावटी पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी फुलून गेली. बक्षीस वितरण संबंधी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस,माजी जी.प.व जिल्हा बँकेचे संचालक संतोषसिंह रावत यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करतांना बैल हा आपल्या घरचा सदस्य आहे. असे समजून त्याची विक्री न करता त्याच्या आयुष्यभर जपणूक करावी असा अमूल्य संदेश देऊन बक्षिसांचे मानकरी ठरलेल्या सर्व स्पर्धकांचे व सहभागी बाल गोपालांचे कौतुक केले. उत्कृष्ट नंदी प्रथम मनन मोहबंशी, द्वितीय श्रेयानं मडावी, वेशभूषा प्रथम वैरिक्षा हेडाऊ, द्वितीय सीया टिंगुसले, यांचेसह दोन्ही स्पर्धेत सहा बक्षिसे मंचावर उपस्थित संतोषसिंह रावत,ममता रावत,सभापती राकेश रत्नावार,सोसायटी अध्यक्ष घनश्याम येणुरकर, सभापती विलास कागदेलवार, विवेक मूत्यलवार, नगर सेवक रीतीक गोयल, अतुल गोवर्धन, नितीन गद्देवार, अशोक येरमे, लीना फुलझेले,नलिनी आडपवार,चंदा कांमडी, समीक्षा कळसकर, रुपाली संतोषवार, सुशीला खोब्रागडे ,ज्योती चतारे,गुरुदास चौधरी, यांचेसह नगरसेवक यांचे हस्ते वॉशिंग मशीन,कुलर,रेंजर सायकल,कुकर होम थिएटर,असे आकर्षक बक्षिसे देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण संजय घोटेकर,शंकर दडमळ,नलिनी आडपवार,रश्मी आडकीने,सोनाली गदेवार ,प्रणित नमूलवार यांनी केले. संचालन सुनील शेरकी यांनी केले तर आभार गुरु गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मित्र परिवार, युवाशक्ती क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य, माँ.दुर्गा मंदिर समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News