Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल* *प्रा.रामभाऊ महाडोरे* *आमसभेत महात्मा...

*क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल* *प्रा.रामभाऊ महाडोरे* *आमसभेत महात्मा व सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा असलेल्या घड्याळीचे सभासदांना वाटप*

*क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल* *प्रा.रामभाऊ महाडोरे* *आमसभेत महात्मा व सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा असलेल्या घड्याळीचे सभासदांना वाटप*
मुल – क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेला संस्थेचे ज्येष्ठ मुख्य सल्लागार माजी जी.प. सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे संचालक पी.व्हि.कोमलवार, साहेब सल्लागार डॉ.पद्माकर लेंनगुरे,रत्नमाला ठाकरे, अजय महाडोरे, अशोक येरमे,उषाताई शेंडे,विवेक मोहूरले,दीपक वाढई, कायदेविषयक सल्लागार ॲड.नागोशे, ॲड.मांदाडे, उपस्थित होते.

मूल येथे १९ पतसंस्था असतांना या स्पर्धेत आपल्या पतसंस्थेने उत्तम प्रगती केली आहे. तरी सुद्धा प्रत्येक सभासदांनी संस्थेची स्वनिधी वाढविण्यासाठी आपले शेअर्स वाढऊन सेविंग व ठेवी ठेवाले, प्रत्येकांनी आपले खाते काढले तर मात्र संस्था पुन्हा उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करेल.असे उत्कृष्ट मार्गदर्शन मुख्य सल्लागार प्रा. रामभाऊ महाडोरे यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनीही अध्यक्षीय भाषणात प्रत्येक सभासदानी आपल्या कुटुंबीयांची महिन्याची आर.डी. काढून आपले व संस्थेचाही स्वानिधी वाढविण्यास संस्थेला सहकार्य करावे. असे आव्हान केले. २२ वर्षापूर्वी संस्थेची निर्मिती कशी झाली,कोणत्या उद्देशाने झाली. याचा पूर्ण लेखा जोगा प्रास्ताविक मनोगतातून उपाध्यक्ष गुरुदास चौधरी यांनी सादर केले.
यानिमित्त सभासदांच्या १० वी मधील ओंकार नागोशे, माणसं निकुरे, शाश्वत तरोने तर २२ मधील साहिल चौधरी, दिव्यांसू सोनुले, सोनाली वाढती या गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आमसभेला उपस्थित सर्व सभासदांना संस्थेतर्फे क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा असलेली घड्याळ प्रत्येक सभासदांच्या घराघरात पोहचावे या उदात्त हेतूने मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
विषय सुचीनुसार संपूर्ण अहवाल वाचन व्यवस्थापक आर. टी. गुरनुले यांनी केले. सभेचे संचालन रोखपाल भाऊजी लेनगुरे यांनी केले. तर आभार लिपिक सौ. यामिनी भेंडारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दैनिक अभिकर्ते, अशोक महाडोळे,गणेश सोनुले, मनोज ठाकरे,श्रीनिवास टिकले, संदीप वाढाई, पिंटू महाडोळे इत्यादींनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News