*मूल शहरात मेघ गरजनेसह दमदार पाऊस, पण तालुक्यात मात्र रिमझिम* मूल – यावर्षीचा पाऊस कृत्रिम रित्या पडल्यासारखा येत असून गावात मूल नगरात सायंकाळी ६ च्या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आला. विजेची गर्जना आवाज मोठी भीतीदायक होती. घराचे दरवाजे खिडक्या भीतीमुळे बंद कराव्या लागल्या पाऊसह अर्धा तास दमदार आला. लोट निघाला परंतु याच वेळेला तालुक्यातील पाऊसाची परिस्थिती जाणून घेतली असता मूल पासून दोन ते तीन की.मी. अंतरावर असलेल्या ग्रामीण खेडे गावात मात्र फक्त १५ मिनिट रिमझिम पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे यावर्षीचा पाऊस कृत्रिमरीत्या पाडत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिली आहे. धानाच्या उत्पन्नाला चांगला जोरदार पाऊसाची गरज आहे. परंतु त्याप्रमाणात पाऊस पडत नसल्याने शेतकरी संकटात का
सापडला आहे. सिंचनाच्या पाण्यासाठी झगडे सुरु झाले आहेत. रात्रभर जागून शेतीला पाणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. एकतर सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने शेतकऱ्यांचे धान उत्पन्न मारण्याच्या मार्गावर असताना निसर्गाचा समतोल मात्र बिघडला आहे. विजेच्या गडगडाट मुळे विद्युत पुरवठा अर्धातास खंडित झाला होता.




