Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*शेतकरी संकटात असूनही सरसकट कर्ज माफी नाही, बोनस नाही, तालुक्यात सिंचनाची सोय...

*शेतकरी संकटात असूनही सरसकट कर्ज माफी नाही, बोनस नाही, तालुक्यात सिंचनाची सोय नाही,धानाला भाव नाही, प्रोत्साहन अनुदान नाही,पीक विमा नाही,२४ तास वीज नाही, पाच वर्षापासून डिमांड भरूनही मोटार पंपाला विद्युत पुरवठा नाही* *शेतकऱ्याला फक्त आश्वासनांचे गाजर, तर उद्योग पतींचे कर्ज माफ*. *शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास तालुका काँग्रेस रस्त्यावर उतरणार*

*शेतकरी संकटात असूनही सरसकट कर्ज माफी नाही, बोनस नाही, तालुक्यात सिंचनाची सोय नाही,धानाला भाव नाही, प्रोत्साहन अनुदान नाही,पीक विमा नाही,२४ तास वीज नाही, पाच वर्षापासून डिमांड भरूनही मोटार पंपाला विद्युत पुरवठा नाही*
*शेतकऱ्याला फक्त आश्वासनांचे गाजर, तर उद्योग पतींचे कर्ज माफ*. *शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास तालुका काँग्रेस रस्त्यावर उतरणार*
मूल – मूल तालुक्यात कित्येक वर्षापासून शेतीला सिंचनाची सोय नसल्याने तालूक्यातील धान पीक लहरी पाउसामुळे व अती उष्णतेमुळे करपायला लागले असून असंख्य शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने शेतक-यांना दिलेले आश्वासन अजुनही पुर्ण झालेले नाही. तालूक्यात व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राात अशी कायम स्वरुपी कोणतीही सिंचनाची सोय नाही.याचा फटका मूल पोंभुर्णा बल्लारपूर, चंद्रपूर तालूक्याला बसला आहे.
गोसेखुर्द आलोसामेंढा तलावात भरपूर प्रमाणात असून सुध्दा नदीला सोडले जात आहे. परंतू प्रत्येक शेतक-यांच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यांस सावली सिंचाई विभागाने पाईप लाईन व वॉल दिले नाही, नियोजन शुन्य काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा नियुक्त केलेल्या नाही. प्रत्येक करीता पाण्यासाठी शेतक-यांचे भांडण तंटे होत आहेत याला जबाबदार सत्ताधारी शासन आहे.
नदी नाल्याला लागुन असलेल्या शेतक-यांना महावितरण विद्युत विभागाने १२ तासाचे लोडशेडींग लावले असल्याने मोटारपंप लावून सुध्दा उपयोग नाही. याला जबाबदार विद्युत विभागाचे अधिकारी असून शेतकऱ्यांनी केलेल्या खालील मागण्या पूर्ण कराव्या, सरसकट कर्ज माफी द्यावी,बोनस द्यावे,प्रोत्साहन अनुदान द्यावे,मागील पीक विमा द्यावे,धानाला पाच हजार रुपये भाव द्यावे, शेतीची नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस करावा २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा. अन्यथा मूल तालुका काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असा ईशारा शेतकऱ्यांच्या वतीने तालुका काँग्रेसने पत्रकार परिषदेत दिला आहे. काँग्रेसचे नेते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस,माजी जी.प.व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हा महासचिव, बाजार समिती सभापती,न. प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार,महासचिव व आदर्श खरेदी विक्री सोसायटी अध्यक्ष घनश्याम येनुरकर,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी,बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, कृषी बाजार समिती संचालक सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार, नगर सेवक अशोक येरमे, संचालक किशोर घडसे,हसन वाढई, चंदा कांमडी,शेतकरी विनोद कांमडी, किरण पोरेड्डीवार,हीवराज ठेमस्कर,धनराज मोहुंर्ले, दिवाकर कमीडवार, सुभाष निकुरे, महादेव नागोशे, जोगेश्वर घोंगडे, दशरथ वाकुडकर, योगेश शेरकी, युवक अध्यक्ष पवन निलंमवार,प्रशांत उराडे,व तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

*शेतक-यांच्या खालील मागण्या*

1) धानाचे पीक होईपर्यंत विद्युत विभागाने तीन महिणे लोडशेडींग बंद ठेवावे, 24 तास विज सुरु ठेवावे

2) गोसेखुर्द आसोलामेंढा तलावाचे पाणी प्रत्येक शेतक-यांना टेल पर्यंत पोहचविण्यासाठी पाईप लाईन व वॉल त्वरीत देण्याची व्यवस्था सिंचाई विभागाने करावी

3) शासनाने केलेली कर्ज माफी चुकीची आहे. थकीत कर्जदारांना कर्जमाफी व नियमित कर्ज भरणा-यां शेतकक-यांना कर्जमाफी नाही. हा शासनाने केलेला भेदभाव काढून सर्वांनाच सरसकट कर्जमाफी द्यावी.

4) आधारभुत भाव नोंदणी केलेल्या शेतक-यांना बोनसची रक्कम कां दिली नाही.

5) प्रोत्साहन भत्याचे अनुदान शेतक-यांना केंव्हा देणार.

6) मागील वर्षी खरीप व रब्बी पिकांचे आकस्मीक पाउसामुळे नुकसान झाले. त्या शेतक-यांना पीक विम्याचा लाभ कां देण्यांत आलेला नाही.

7) धानाला 5000 /- हजार रुपये भाव देण्यांत यावा.

8) मूल तालूक्यातील केळझर-बेंबाळ परिसरात लोडशेंडींग नाही. परंतू सुशी दाबगांव, खालवसपेठ, चिरोली कांतापेठ परिसरात लोडशेडींग आहे. हो भेदभाव कां?

9) धान व तुर पिकांची नुकसान करणा-या रानटी डूकरांचा वाघाचा,वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अन्यथा डुकरे मारण्याची परवानगी द्यावी.

10) धानाला 5000 /- हजार रुपये भाव देण्यांत यावा.

11) कर्जमाफीमधील 2188 सभासद पैकी 1437 शेतक-यांची नावे आली असून उर्वरीत 751 कर्जदारांची यादी आलेली नाही. व नियमित कर्ज भरणा-यांच्या बाबतील शासनाचा काहीही निर्णय आलेला नाही.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News