Sunday, August 2, 2026
Google search engine
Homeमूलमातोश्री कमलादेवी चंदनशिंह रावत यांचे स्मृती प्रीत्यर्थ संतोषशिंह रावत यांनी जीर्णोद्वार...

मातोश्री कमलादेवी चंदनशिंह रावत यांचे स्मृती प्रीत्यर्थ संतोषशिंह रावत यांनी जीर्णोद्वार केलेल्या श्री.हनुमान जयंती निमित्य पाच हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मूल(गुरु गुरनुले) प्रदेश काँग्रेसचे महासचिव व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मृतीप्रित्यर्थ मूल बस स्थानकावर अनेक वर्षांपूर्वी हनुमान मंदिराची स्थापना केली. तेव्हा पासूनच दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने थाटामाटात साजरा केल्या जात असून हे मंदिर भाविकांचे एक जागृत श्रद्धास्थान बनले आहे. मुल हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मूल स्थानकावर सिंदेवाही, पोभूर्णा, सावली, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी, नागपूर चामोर्शी, गोंडपीपरी बसने व खाजगी ट्रॅव्हलने जाणारे येणारे हजारो भाविक या श्री.हनुमानाचे दर्शन घेत आहेत. हनुमान जयंती निमित्त सकाळी ६.३० वाजता मंदिर समिती प्रमुख रुपलसिंह रावत यांचे शुभहस्ते व संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत मुकेश मिश्रा महाराज यांचे मंत्रोपचाराने मूर्ती पूजन महा अभिषेक करण्यात आले. सकाळी ८ वाजता दहेगाव मानकापूर येथील किशोर पैदाम यांचे प्रसिद्ध भजन मंडळ यांच्या भक्त संगीताचा व काल्याचा कार्यक्रम करण्यात आला.

सकाळ पासूनच श्रीरामभक्त हनुमान बांच्या दर्शनासाठी मुल शहरातील भक्तजन व येणारे जाणारे हजारो प्रवाशी यांनीही हनुमानाचे दर्शन घेतले. दुपारी ११.३० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.महाप्रसादाचे दाते संतोषसिंह रावत, ममता रावत, रूपल रावत,मोना रावत,दीपक रावत, छोटू रावत,यांनी महाप्रसादाचे वाटपाला सुरुवात केली. यांचेसह सभापती राकेश रत्नावार,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार,कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, उपसभापती राजेंद्र कन्नमवार,सुनील मंगर,लोमेश नागपुरे,सभापती विलास कागदेलवार,धनंजय चिंतावार, नगर सेवक नितीन गद्देवार, बंडू गुरनुले,तुकाराम गुरनुले, नंदू कागदेलवार, विलास पुल्लकवार, सभापती नलिनी आडपवार, वाबबलू सय्यद, चंदू चटारे, तेजस महाडोळे, दीपक चुगाणी, शिवा चिलके, शिवम चल्लावार, अभिजित चेपूरवार, चतुर मोहुर्ले, प्रवीण खानोरकर, निखिल पांडव, राजू गावतुरे, संजय टिकले, डेव्हिड खोब्रागडे, यांचेसह हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी, युवाशक्ती मंडळाचे सदस्य यांनी सहकार्य केले. सकाळी ११ ते ३.३० पर्यंत शाळेचे विद्यार्थी, महिला, पुरुष, प्रवासी, असे पाच हजार हजारचे वर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News