Monday, August 3, 2026
Google search engine
HomeMulआदर्श शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेवर संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वर्चस्व

आदर्श शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेवर संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वर्चस्व

घनश्याम येनुरकर, उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार यांची अविरोध निवड

मूल -आदर्श शेतकी खरेदी विक्री सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून काँग्रेस नेते,प्रदेश काँग्रेसचे महासचिव, माजी जी.प.अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात अविरोध करण्यात आली असून अध्यक्ष पदी घनश्याम येनुरकर,उपाध्यक्ष पदी राजू पाटील मारकवार,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून न. प. उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, विविध सह.सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, प्रायमरी सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार, रुमदेव गोहने, माजी.जी.प.सदस्या मंगला आत्राम, स्मिता कामडे, गणेश खोब्रागडे,हीवराज ठेमस्कर, यांची अविरोध निवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही झटणार व त्यांना योग्य दरात,खत,बियाणे,कीटक नाशक औषधे मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असे मनोगत अध्यक्ष घनश्याम येनुरकर,उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार यांनी व्यक्त केले. काँग्रेस कमिटी तर्फे नवनिर्वाची अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालकांचे प्रमुख अतिथी नगराध्यक्ष एकता समर्थ,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, न.प.बांधकाम सभापती प्रशांत समर्थ,महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार,यांनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.प्रमुख अतिथी नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.तसेच काँग्रेस कमिटीला ३० खुर्च्या भेट दिली. तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्षाची भूमिका यावर मार्गदर्शन केले.संचालन सुनील शेरकी यांनी केले.आभार महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार यांनी मानले. मंचावर मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे,उपाध्यक्ष विनोद गाजेवार, नगर परिषद सभापती,सर्व नगर सेवक,सरपंच,काँग्रेस पदाधिकारी,बाजार समिती संचालक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News