*विविध संस्थेच्या वतीने महात्मा फुलेंना जयंती निमित्य विनम्र अभिवादन*
मुल- देशातील पहिला महात्मा, थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपल्या पुस्तकात लिहिणारे, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे सत्यशोधक पहिले क्रांतिकारी क्रांती सूर्य महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांती ज्योती नागरी सहकरी पतसंस्थेच्या सभागृहात साजरी करण्यात आली.
क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्था, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय विकास संस्था, माळी महासंग, अखिल भारतीय समता परिषद, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मुल, सावित्रीमाई फुले महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे संचालक व नगर परिषदेचे नगरसेवक अशोकराव येरमे, प्रमुख अतिथी अखिल भारतीय समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मलार्पण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा रत्नाताई चौधरी, महिला बचत गटाच्या प्रमुख सीमाताई लोनबले यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्य यावर उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी प्रा.विजय लोनबले यांनी महात्मा फुलेंनी केलेले कार्यच आजच्या लोकशाहीला जिवंत ठेवत असल्याचे आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरु गुरनुले यांनीही आयोजन केलेल्या विविध संस्थेचे व संघटनेच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव येरमे यांनी जर महात्मा फुले नसते तर… काय झाले असते. हा त्यांच्या इतिहासातून आज आपण शिकत आहों असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माजी प्राचार्य श्रीरंग नागोसे,सेवानिवृत्त शिक्षक धनंजय गुरनुले, ईश्वर लोनबले शिक्षक, माधुरी गुरनुले, व्यवस्थापक आर. टी.गुरनुले, संदीप वाढई, संस्थेचे सदस्य, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भाऊजी लेनगुरे यांनी केले.तर आभार यामिना भेंडारे यांनी मानले.




