*ए आय च्या चुकीच्या वापरामुळे शाळकरी मुलांमध्ये वाढते गुन्हेगारीचे सावट*
*(पालकांनी मुला मुलींकडे लक्ष देण्याची गरज) ( आरोपीवर खडक कारवाई करावी मूल तालुका काँग्रेस व महिला काँग्रेसने केली मागणी आव्हान)*
मूल – आजच्या डिजिटल युगात ए आय(AI) इन्स्ट्राग्राम,स्नॅप चॅट,व्हाट्सअप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या अॅप्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढत्या वापरासोबतच एक अत्यंत धोकादायक वास्तव समोर येत आहे—शाळकरी मुलं आणि मुली गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वेगाने वळत असल्याचे भीषण चित्र दिसत आहे.
अल्पवयीन विद्यार्थी शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी जात आहेत. सुरुवातीला केवळ करमणूक, मित्रांशी संवाद किंवा फोटो-व्हिडिओ शेअर करण्यासाठी वापरले जाणारे हे अॅप्स हळूहळू गुन्हेगारीच्या दारात नेणारे माध्यम बनत आहेत. ओळखी-अनोळखी लोकांशी वाढणारा संपर्क, खोट्या ओळखीची खाती, आणि सहज उपलब्ध असलेले चुकीचे कंटेंट यामुळे अनेक मुले फसवणूक, ब्लॅकमेलिंग, सायबर छळ आणि अश्लील कृत्यांमध्ये अडकताना दिसत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, या मुलांना त्यांच्या कृत्याचे गांभीर्यच उमगत नाही. “मजेसाठी” सुरू झालेली गोष्ट काही क्षणात गुन्ह्यात परिवर्तित होते. सोशल मीडियावर मिळणारी खोटी प्रसिद्धी, लाईक्स आणि फॉलोअर्सची भूक मुलांना चुकीच्या मार्गावर ढकलत आहे. काही प्रकरणांमध्ये तर ऑनलाईन टोळ्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अल्पवयीन मुलांचा वापर करून मोठे गुन्हे घडवून आणत असल्याचेही समोर येत आहे.
सोशल मीडियाचा अतिरेक हा केवळ वेळेचा अपव्यय नसून तो भविष्यासाठी घातक ठरत आहे. मानसिक ताण, नैराश्य, आक्रमक वर्तन, अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि चुकीच्या सवयी यामुळे अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आज मोबाईलच्या पडद्यामागे सुरू असलेले हे ‘डिजिटल गुन्हे’ उद्या प्रत्यक्ष आयुष्यात मोठ्या गुन्ह्यांचे रूप घेऊ शकतात—ही बाब अत्यंत गंभीर आहे. मूल नगरात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून पहिली घटना ९/४/२६ रोजी एका अल्पवयीन पीडिते सोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून धमकऊन लाखो रुपये व सोन्याचे दागिने लंपास केले.यात वेदांत बुरांडे,प्रारब्ध किर्तीवार, कृष्णा व्यास या तीन आरोपीवर विनयभंग,खंडणी,पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी घटना १०/४/२६ रोजी घडली असून पीडितेचे अश्लील व्हिडिओ वायरल करुन अल्पवइन मुलींवर स्वतःच्या घरीच बोलाऊन लैंगिक अत्याचार केल्याने आरोपी राजीव अमर डोंगरे याला ३७६ सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अशा गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना आरोपींवर खडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मूल तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. असून पालकांना कठोर आणि सजग भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी सतत संवाद साधणे आणि योग्य मूल्यांचे संस्कार देणे ही काळाची गरज बनली आहे. केवळ मोबाईल देऊन पालकांची जबाबदारी संपत नाही, तर त्या मोबाईलमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करणे हीच खरी जबाबदारी आहे.
तसेच पोलिस प्रशासनानेही या वाढत्या सायबर गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती, सायबर सुरक्षा शिक्षण आणि वेळोवेळी मार्गदर्शन केल्यास या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.
आजची तरुण पिढी ही देशाची ताकद आहे. मात्र सोशल मीडियाचा अनियंत्रित आणि चुकीचा वापर ही ताकद कमकुवत करत आहे. जर आत्ताच कठोर पावले उचलली नाहीत, तर उद्याची पिढी गुन्हेगारीच्या अंधारात हरवण्याचा धोका नाकारता येणार नाही.के




