Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*जादूटोणा गुप्तधनासाठी कासव घुबडाचा वापर सहा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात* परराज्यात कनेक्शन असल्याचे...

*जादूटोणा गुप्तधनासाठी कासव घुबडाचा वापर सहा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात* परराज्यात कनेक्शन असल्याचे संकेत

*जादूटोना गुप्तधनासाठी कासव, घुबळाचा वापर* *सहा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात* *परराज्यात कनेक्शन असल्याचे संकेत*

मूल – गुप्तधन व जादूटोना करण्यासाठी कासव व घुबडाची शिकार केल्या प्रकरणी सावली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ३ आरोपींना २० एप्रिल पर्यंत वनकोठडी तर उर्वरीत तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नियत क्षेत्र सिरसी मधील चिचडोह बॅरेज जवळ अवैधरित्या कासव बाळगून वाहतूक करीत असताना १२ एप्रिल रोजी वनविभगाने सहा जणांना अटक केली. यात गंगाधर पांडू बुरांडे (४९), मोरेश्वर देविदास देवतळे (३८), ओम देव
तीन आरोपींना वनकोठडी तर तिघांना न्यायालीयन कोठडी,

गिताबाई शिंदे (२५), हेमचंद उमाजी शेंडे (२८), धवल उष्ट्र वेलादी (३०), राजेंद्र शामराव दिवसे (५२) यांना अटक केली होती. हे सर्व आरोपी जाम खुर्द तालुका पोंभूर्णा, जिल्हा चंद्रपूर तसचे गणपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली व चक नवेगाव, पोस्टनवेगावमोरे, तालुकापोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर येथील रहीवासी

गुन्हा असल्याचे कळते. सहाही आरोपींविरुद्ध वन नोंदविण्यात आला. चौकशी दरम्यान वरील सहाही आरोपींचे मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता, वन्य प्राणी कासव व घुबड यांच्या व्यापारातील पुरावे पुढे आले. व्यापारातील इतर लोकांशी साधलेला संवाद, मोबाईल मध्ये अवैधरित्या

बाळगलेल्या वन्य प्राण्यांचे फोटो व व्हिडिओ तपासणीत आढळले. सदरचे वन्य प्राण्यांचा त्यांनी अमानुषपणे व्यापार व व्यवहार करून त्यांच्या जीवितास व अस्तित्वास धोका निर्माण केलेला आहे. वन्यप्राणी कासव हा प्राणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील अनुसूची मध्ये समाविष्ट आहे. कासवाचे पर्यावरण संतुलनात अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन व शिकारीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्या संख्येत घट होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कासव वन्य प्राण्यास

कायद्या नुसार संरक्षण दिले आहे. दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी वनकोठडीतील सहाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता ३ आरोपींना ५ दिवसाची दिनांक २० एप्रिल २०२६ पर्यंत वनकोठडी तर उर्वरित तीन आरोपींना ३० एप्रिल २०२६ पर्यंत पंधरा दिवसाची मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावली. पुढील तपास राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर, विकास तरसे सहायक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली व मारुती पुल्लेवाड क्षेत्र सहाय्यक व्याहाड व सावली वनकर्मचारी करीत आहे.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News