Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाणी पुरवठ्यावर राजकारण करणाऱ्या भाजप स्थानिक नेत्यांनी सत्य काय ते शोधावे- नगराध्यक्ष...

पाणी पुरवठ्यावर राजकारण करणाऱ्या भाजप स्थानिक नेत्यांनी सत्य काय ते शोधावे- नगराध्यक्ष एकता समर्थ, नगर परिषद नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास सक्षम

*पाणी पुरवठयावर राजकारण करणाऱ्या भाजपानी पहिले सत्य काय ते शोधावे, नगराध्यक्षा एकता समर्थ*
*नगर पालिका पाणी पुरवठा करण्यास सक्षम*
मूल – मूल नगरात चार दिवस पाणी का,आला नाही, याबाबत सत्य परिस्थिती काय आहे ते पहिले शोधावे नंतरच आरोप करावे, असा शाब्दिक टोला भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी मारला. स्थानिक नेते पाणी समस्यावर राजकारण करून जनतेची दिशाभूल करू नये असा आरोप सुद्धा नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी केला. स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. घागर मोर्चा काढून त्यांनी जनतेची दिशाभूल केली. मूल शहराला हरणघाट पंप हाउस येथून पाणी पुरवठा होतो. बेंबाळ ते हरणघाट असा वीज पुरवठा येथे आहे. या मार्गावर वादळवा-यामुळे ११ जून रोजी विजेचे सहा खांब वाकले आणि त्यावरील तारा तुटल्या. यात त्याच फिडरवर असलेल्या ९ गावचा विद्युत पुरवठा बंद होता. अशा तांत्रिक कारणामुळे चार दिवस येथिल पाणी पुरवठा बंद होता. त्यांनतरही पाणी भरत असताना अचानक विजेचे दाब वाढले, साहित्य खराब झाले. त्यात नवीन दुरूस्ती करण्यात आली. यामध्ये नगर पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत असताना एका व्यक्तीचा पोल वरुन पडून अपघातही झाला. तरी देखील प्रयत्न केले. त्यामुळे १७ जून पासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक कारणाला कोणी टाळू शकत नाही. मात्र येथील भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी घागर मोर्चा काढून नगर पालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सत्य परिस्थीती जाणून न घेता त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यांच्या राजकारणाला आम्हालाही उत्तर देता येते असा इशारा नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी दिला. मूल शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही भाजपाच्या कार्यकाळात टाकलेली आहे. या पाईप लाईन मध्ये लिकेज प्रमाण अधिक वाढले आहे. ते लिकेज दुरूस्तीचे काम सुरू आहे. यासाठी साहित्य खरेदी साठी पैसा खर्च झाला. मात्र लिकेज दुरूस्तीसाठी पालिकेकडून कोणताही पैसा खर्च करण्यात आला नाही. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. वारंवार होणा-या वीज खंडीत मुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. त्यामुळे 132 केव्हीचा नवीन प्लांट तयार होत आहे. त्यातून पंप हाऊस साठी वीज जोडणी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे समर्थ यांनी यावेळी सांगितले. लोकसंख्येच्या मानाने मूल शहराला पाणी पुरवठा करणा-या चार पाण्याच्या टाक्या कमी पडत आहे. त्यासाठी पाच लाख लिटरच्या दोन नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यासाठी दहा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मूल नगर पालिका सक्षम असल्याचे त्यांनी सरते शेवटी सांगितले. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राकेश रत्नाावार, पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, महिला व बालविकास सभापती नलिनी आडपवार, उपसभापती मनिषा कडस्कर, शिक्षण सभापती लीना फुलझेले, नगरसेविका ज्योती चटारे, काजल धारणे, सुशीला खोब्रागडे, अश्विनी कामडी, नगरसेवक अतूल गोवर्धन, रितिक गोयल, बंडू गुरनूले आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.
*२८ कोटी रुपयाची योजना कशी आहे याचा अभ्यास भाजपा पदाधिकाऱ्यांनी कधी केला नाही*
भाजपाच्या काळात २८ कोटी रूपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना केली. परंतु ती योजना,पाईप लाईन बरोबर झाली की,नाही याचा अभ्यास भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला नाही. या अंतर्गत घरोघरी मिटर लावण्यात आले. ते मिटर अजुनही सूरू झालेले नाही. पाईप लाईन निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले त्यामुळेच लिकेजचे प्रमाण वाढले. तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. त्यांनाच आत्मचितनाची गरज आहे. असे मत उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News