*तालुका कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण* मूल – आज दिनांक – 25/06/2026 आत्मा रोज गुरुवारला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2026-27 अंतर्गत खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये माननीय श्री. अरुण कुसळकर साहेब, प्रकल्प संचालक (आत्मा), चंद्रपूर, श्री प्रवीण देशपांडे, विषय तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, श्री.डी.वी. ताथोड, विषय तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, सौ. रेवता सोनुले, सरपंच,भादुर्णी व सौ. वैशाली कोकोडे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील व तालुक्यातील शेतकरी सदर प्रशिक्षणात उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये माननीय प्रकल्प संचालक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ज्यामध्ये आत्मा अंतर्गत विविध योजनांबद्दल माहिती दिली व तसेच नैसर्गिक शेती बद्दल माहिती दिली. यामध्ये दशपर्णी,जीवामृत, बिजामृत व इत्यादी बाबींचा समावेश करण्यास लोकांना आवाहन केले. नंतर श्री. प्रवीण देशपांडे कीटक शास्त्रज्ञ यांनी भात पिकावरील विविध की व रोगांबद्दल माहिती दिली. तसेच श्री.ताथोड यांनी कृषी यांत्रिकीकरणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे. पी. झोडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले. श्री. शुभम नेवरे, सहाय्यक कृषी अधिकारी, भादुर्णी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आत्मा विभाग व कृषी विभाग यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.




