Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुंजेवाही येथील व्याघ्र पीडीत निराधार चार कुटुंबियांना समाज संघटनेने दिला आधार. पीडित...

गुंजेवाही येथील व्याघ्र पीडीत निराधार चार कुटुंबियांना समाज संघटनेने दिला आधार. पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची समाज बांधवांची मागणी.

*समाजसेवी संघटनांतर्फे व्याघ्रपिडित निराधार कुटुंबांना मदतीचा आधार*

*व्याघ्रपिडित कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी शासकीय नोकरीची मागणी*

मूल – २२ मे हा दिवस जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला. वनक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या माळी समाजातील चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेच्या अवघ्या महिनाभरापूर्वी याच गावातील वच्छला वाटगुरे या महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. वर्षभरात घडलेल्या या ५ सलग आणि दुर्दैवी घटनांमुळे गुंजेवाही परिसरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भीती व शोककळा पसरली असून या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्रालाही हादरवून सोडले आहे.

गुंजेवाही येथे वाघाच्या भीषण हल्ल्यात कवलाबाई मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी या चार महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मोलमजुरी व तेंदूपत्ता संकलनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या माळी समाजातील या चारही महिला आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या. सुनीता मोहुर्ले यांच्या निधनाने त्यांच्या दोन चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत. कवलाबाई मोहुर्ले व अनिता मोहुर्ले या सख्ख्या बहिणींच्या मृत्यूमुळे त्यांची वृद्ध आई आणि भाऊ निराधार झाले तर संगीता चौधरी यांच्या निधनाने त्यांच्या दिव्यांग पतीचा सर्वात मोठा आधार हिरावला गेला आहे. या चारही कुटुंबांवर ओढवलेले हे दुःख केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारे आहे.

मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेची दखल महात्मा फुले मित्र मंडळ, ब्रम्हपुरी, अ.भा.माळी महासंघ,चंद्रपूर जिल्हा,माळी महासंघ,चंद्रपूर जिल्हा आणि समता परिषद,चंद्रपूर यांनी घेतली व सर्वांच्या वतीने समाजाला व्याघ्रपिडित कुटुंबाला यथाशक्ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आणि डॉ. एन. एस. कोकोडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री जयकुमार गोरे, जिल्याचे पालकमंत्री, मानवाधिकार आयोग, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आमदार, वनसंरक्षक चंद्रपूर व ब्रम्हपुरी विभाग यांना निवेदन दिले. या माध्यमातून शासनाकडे आर्थिक निधी, व्याघ्रपिडित कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी शासकीय नोकरी, वनाधारित उत्पादन प्रकल्प उभे करून ग्रामीण लोकसंख्येला बारमाही रोजगार उपलब्ध करून द्यावा इ. मागण्या करण्यात आल्या.

सर्व समाजसेवी संघटनांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व कमी कालावधीत सुमारे दिड लाखाहून अधिक मदतनिधी जमा झाली. ही मदतनिधी वरील सर्व समाजसेवी संघटना, सिनियर सिटीझन कोसरे माळी असोसिएशन,नागपूर , माळी समाज संघटना सिंदेवाही , अ भा माळी महासंघ मुलं व महाराष्ट्रातील विविध भागातून प्राप्त झाली. या मदतनिधीचे वितरण व्याघ्रपिडित पाचही कुटुंबांना समप्रमाणात करण्यात आले. यासाठी आयोजित मदतनिधी सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन. एस. कोकोडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नामदेवराव जेंगठे,प्रा. धनंजय वाढई, प्रा.नकटू सोनुले, प्रा. अरुण शेंडे, वंदनाताई शेंडे,अशोक शेंडे, सुभाष शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी विचारमंचावर विजय मोहुर्ले, डॉ. भास्कर लेनगुरे, डॉ. राजू आदे, डॉ.राहुल मोहुर्ले,
डॉ. पंकज बेंदेवार, दिलीप लोनबले, कावळे, गंगाधर गुरनुले उपस्थित होते.
स्थानिक जिल्यातील विधिमंडळ सदस्यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात व्याघ्रपिडित कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी नोकरीची मागणी करावी ही जनतेची मागणी समस्त माळी समाज संघटनेकडून गुंजेवाही ग्रामस्थांकडून, जिल्ह्यातील सर्व स्तरातून केली जात आहे.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News