Sunday, August 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोसेखुर्द धरणाचे पाणी नदीला सोडण्यापेक्षा आसोला मेंढा नहराला सोडावे* *धानाचे पन्हे व...

गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीला सोडण्यापेक्षा आसोला मेंढा नहराला सोडावे* *धानाचे पन्हे व आवत्यां वाचविण्यासाठी शेतकरी सुमित आरेकर यांची मागणी*

*गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीला सोडण्यापेक्षा आसोला मेंढा नहराला सोडावे* *धानाचे पन्हे व आवत्यां वाचविण्यासाठी शेतकरी सुमितआरेकर यांची मागणी

मूल : यावर्षीच्या २०२६ खरिपाच्या हंगामाची पूर्ण पेरणी शेतकऱ्यांनी केली असून मागील पंधरा दिवसांपूर्वीच थातूरमातूर पाऊस पडला. रोवण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी धानाचे पन्हे टाकले तर सर्वसाधारण व गरीब असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला खर्च जास्त येते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी धान आवत्या टाकले आहेत. परंतु हंगाम सुरु झाल्यापासून तर आजपर्यंत मुल सावली, तालुक्यात फक्त थोड्या प्रमाणात पाऊस थिरकला परंतु धान पिकाला लागणारा पाऊस अजूनही पडला नाही. आजच्या स्थितीत, खाजगी गाव तलाव, मामा तलाव, नदी, छोटे नाले, बोड्या, पूर्णतः कोरडे पडले आहे.

तरी देखील पाऊसाचा पत्ताच नाही. त्यामुळे अती तीक्ष्ण व गर्मीच्या उकाड्यामुळे पेरणी केलेले धानाचे पन्हे, आवत्या धान,कापूस सुकायला लागले असून पिवळसर पडत आहेत. याकरिता शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकरी पाण्या
अभावी अडून बसले आहेत. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पिकाची आशा सोडली असल्याचे बोलून दाखविले आहे. त्यामुळे -मुल सावली दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर तात्काळ गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीला सोडण्यापेक्षा आसोला मेंढा तलावाचे नहरात सोडावे अशी मागणी असंख्य शेतकरी बांधवांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व प्रगतशील शेतकरी सुमित पाटील आरेकर यांनी केली आहे. मूल सावली तालुक्यातील नवेगाव भु. बेंबाळ सावली, खेडिसह पूर्ण गावे व मुल तालुक्यातील राजगड, फिस्कुटी, वीरई, चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नांदगाव, बोंडाळा, चक दुगाळा, येरगाव, चक बेंबाळ, बोरचांदली, चीचाला, येरगाव, इत्यादी गावातील शेतकरी लाभधारक आहेत. तलावातील पाणी सोडण्याची जबाबदारी आसोला मेंढा तलाव नूतनीकरण उपविभाग क्र. ६ उपअभियंता) यांचेकडे आहे.

मुल-तलाठी साजा क्रमांक १२ मंडळ खेडी मध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, खेडी ते गोंडपीपरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टेल पर्यंत शेतीला पाणी पुरवठा व्हायला खूप वेळ लागतो. करीता त्वरित तलावाचे पाणी सोडले तरच यावर्षीचे खरीप पीक वाचतील अन्यथा कोरडा दुष्काळ पडेल अशी अवस्था शेतकऱ्यांची दिसून येत आहे. जर का येत्या दोन दिवसात तलावाचे पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा देखील सुमित आरेकर यांनी दिला आहे. 

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News