Sunday, August 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल तालुक्याला अनेक वर्षापासून राजकीय नेतृत्व लाभूनही तालुक्यात सिंचनाचा अभाव*. *पाण्याअभावी शेतकऱ्यांचे...

मूल तालुक्याला अनेक वर्षापासून राजकीय नेतृत्व लाभूनही तालुक्यात सिंचनाचा अभाव*. *पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक मरणाच्या मार्गावर*.

*मूल तालुक्याला अनेक वर्षापासून राजकीय नेतृत्व लाभूनही तालुक्यात सिंचनाचा अभाव*. *पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक मरणाच्या मार्गावर*.

मूल – ( गुरु गुरनुले) मूल-सावली तालुका पूर्वीचा मतदार संघ,या मतदारसंघाने अनेक खासदार दिले, केंद्रीय राज्यमंत्री दिले, मुख्यमंत्रीही,दिले,मंत्री,राज्यमंत्री,पालकमंत्री, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,सभापती,सदस्य निवडून देताना तालुक्यातील शेतकऱ्यांचे मतच कामी आले आहे. परंतु गेल्या.अनेक वर्षापासून मूल तालुका व तालुक्यातील शेतकरी मात्र अजूनही सिंचनाच्या सोयीपासून वंचितच राहिला आहे. मूल तालुक्यात फक्त मामा तलाव,गाव तलाव याशिवाय कुठलीही सिंचन सुविधा केल्याचे दिसत नाही. . या तालुक्यातून ,मतदार संघातून निर्माण केलेलेखासदार,आमदार, मंत्री, राज्यमंत्री,पालकमंत्री,जी. प.अध्यक्ष यांनी आपल्या कार्यकाळात केवळ शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा सोडून रस्ते, मोठ्या इमारती, शाळा,कॉलेज,बाग बगीचे,नाल्या,मंदिरे उभारण्याचे कार्य केल्याचे दिसून येत आहे. फक्त गोसेखुर्द, आसोला मेंढा तलावाचे पाणी सावली तालुक्यापर्यंत पोहचता केले परंतु यात पूर्ण मूल तालुक्याचा विचारही केल्याचे दिसत नाही. म्हणूनच आजही मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा अभाव असल्याचे बोलून दाखवित आहेत.

गेल्या काहीवर्षापूर्वी मूल तालुक्यासाठी हुंमन प्रकल्प होणार आणि तालुक्यातील शेतकरी सुखी होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली होती. परंतु तो प्रकल्पच रद्द का झाला हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळेच आम्हा शेतकऱ्यांवर अशी वेळ आली आहे. अशा प्रतिक्रिया मूल तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी दिल्या असून अनेक राजकीय नेतृत्व लाभून सुद्धा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच सिंचनाच्या सोयीपासून पोरकाच आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये.? *आज मूल तालुक्यातील शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती* चालू वर्षाचा खरीप हंगाम मे,जून महिन्यापासूनच सुरु झाला असून धान,कापूस,तूर पेरणी झाल्याचे आज पूर्ण पंधरवडा संपलेला आहे. पेरणी केले तेव्हा पासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील धान,कापूस, सोयाबीन,तूर पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. मूल आणि सावली तालुक्यातील शेतांमध्ये ओलावा संपत आल्याने धानाची रोपे पिवळी पडून करपण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून, असोलामेंढा प्रकल्पातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जर आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडले तर याचा लाभ फक्त सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल, परंतु मूल तालुक्यातील शेतकऱ्यांचे कसे. मुलसाठी देवाने पाऊस पाडले तरच तालुक्यातील शेतकरी सुखी होईल.

जून महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान व सोयाबीनची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक भागांतील तलाव, बोड्याजी आणि नाले कोरडे पडले असून, भूगर्भातील पाण्याची पातळीही पूर्णतः खाली गेली आहे. त्यामुळे
शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला जात आहे.

मूल तालुक्यात १११ गावांचा समावेश असून सिंचन क्षेत्र १० हजार हेक्टर आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी धान रोवणीसाठी पळे, कमी अधिक क्षेत्र आवत्या, कापूस,तूर, काही प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली आहे. परंतु गेल्या १८ दिवसापासून पाऊस नसल्याने पिके पिवळे पडायला लागले आहे, करायला लागले आहे. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तरी शासनाने तातडीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष (आफिसमध्ये बसून नाही) पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली जात आहे.
मूल तालुक्यातील काही ठराविक गावांतील शेतकरी असोलामेंढा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. पिके वाचविण्यासाठी प्रकल्पातून तातडीने पाणी सोडल्यास धानाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास फक्त ठराविक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. परंतु मूल तालुका मात्र गेल्या अठरा दिवसांपासून पाऊस न झाल्याने धानाचे परहे आणि आवते सुकू लागले आहेत. शेतातील ओलावा पूर्णपणे आटल्याने जमिनीला भेगा पडल्या असून, रोपे करपण्याच्या मार्गावर आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार. याला पर्याय राहणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, महागडी बियाणे, खत आणि मजुरीचा खर्च झाल्याने दुबार पेरणी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. *शेवटी ” देवा आमचे कसे होणार “*

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News