विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी युवक काँग्रेसचा एल्गार; केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषण
‘नीट’ प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केल्याचा आरोप
(शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती लक्षणीय होती)
मूल:’नीट’ (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेली कथित तडजोड आणि केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्लीतील समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मूल शहरातील गांधी चौक येथे सोमवारी (२० जुलै) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असून, केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
युवक काँग्रेसच्या निवेदनानुसार, ‘नीट’ परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात गेले असून, केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका न घेता मौन बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही तर तीव्र आंदोलन उभारू अशा परखड प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिल्या. सदर आंदोलन उपोषण प्रदेश काँग्रेसचे सरचिटनिस संतोषशिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलन सूरु असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,विधिमंडळ नेते, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान सोबतच पंतप्रधानांनी राजीनामा देत पर्यंत देशात व राज्यात आंदोलन व उपोषण सुरूच राहणार असा इशारा देत उपोषण करत्यांना शुभेच्या दिल्या.
उपोषणादरम्यान केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या कथित खेळाविरोधात सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोनावेळी देण्यात आला आहे.यामुळे ‘नीट’ प्रकरणावरून मूल तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक,काँग्रेसचे पदाधिकारी यांचेसह युवक अध्यक्ष पवन नीलमवार, न. प. अध्यक्षा एकता समर्थ,उपाध्यक्ष राकेश रत्नावर, महासचिव घनश्याम येनुरकर, उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार, सभापती प्रशांत समर्थ, रुपल रावत, ममता रावत, सुमित आरेकर,विलास कागदेलवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,विवेक मूत्यलवार, लीना फुलझेले,चंदा कांमडी,रुपाली संतोषवार, समीक्षा कडसकर, राहुल प्रेमळवार, आकाश दहिवले, भास्कर खोब्रागडे,चेतन कामडे, मिथुन पटवा, नलिनी आडपवार,समता बनसोड, श्याम पूटावावर, एड. हिमानी व. वाकुडकर, कैलास चलाख, हसन वाढइ ,चंदु चटरे, गुरुदास चौधरी,सुनील शेरकी,अशोक येरमे,ज्योती चटारे, काजल धारणे,सीमा भसरकर, भूमिका मडावी,राणी आवझे, किसान हसखल, नंदानी वांलदे , ओम फलके, संस्कृती मुपीदवार, कृष्णा बोरेवार असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उपोषणाची सांगता राष्ट्रगीत,वंदेमातरम गीताने झाली.





