*अतिशय दुर्दैवी घटना* *९ जुलै २६ ला माळी समाजाचे चार मजूर अपघाताचे बळी ठरले* *२२ मे रोजी वाघाने माळी समाजातील चार मजुरांना ठार केले* *दोन्ही घटना सिंदेवाही तालुक्यातील* मूल – सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील हे सर्व मजूर तेलंगणा राज्यात भात रोवणीच्या मजुरीसाठी गेले होते. काल ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, शेतातील काम आटोपून आपल्या खोलीकडे परत जात असताना तेलंगणातील रामगुंडम येथे हा भीषण अपघात घडला.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून चारही बळी ठरलेले माळी समाजाचे असल्याने पुन्हा सिंदेवाही तालुक्यात हाहाकार माजला आहे. मृतांची नावे अतुल वासुदेव सोनुले (वय ४५ वर्ष), अर्चना जनार्धन सोनुले (वय ४० वर्ष), प्रभा सिताराम मोहुर्ले (वय 56 वर्ष) आणि, रंजना प्रभाकर शेंडे (वय ५० वर्ष) अशी मृत महिलेचे नाव आहे हे सर्व माळी समाजाचेच असल्याने दोन महिन्यातच पुन्हा काळाने माळी समाजाचाच घात केला अशी चर्चा केली जात आहे.
- आपल्याकडे स्थानिक तालुक्यात व गाव परिसरात रोजंदारीचे कुठलेही काम मिळत नसल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मजूर धान रोवणी आणि शेतमजुरीसाठी तेलंगणात जात असतात. मात्र, काम संपवून घरी परतत असतानाच या मजुरांच्या वाहनाला रामगुंडम येथे अपघात झाला. या अपघातात तब्बल २७ मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्येच मृतक झालेले चार मजूर यात तीन महिला व एक पुरुष असून यातही दोन महिला माय लेकी असल्याचे समजले. अपघातात बळी ठरलेले चारही मजूर सिंदेवाही तालुक्यातील असून मागे वाघाने ठार केलेल्या गुंजेवाही गावाला लागूनच असलेल्या पवना चक या गावातील आहेत. अपघाताची वार्ता कळताच तालुक्यात व दोन्ही गावात पुन्हा चांगलीच शोककळा पसरली आहे. *चारही मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज* *पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या चारही माळी समाजातील मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात समाज बांधवांनी पुढे करावा अशी विनंती मृतकांच्या कुटुंबियांकडून व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.*





