Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुलमध्ये युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी* *काँग्रेसची खरी ताकद आजचा युवक आहे*...

मुलमध्ये युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी* *काँग्रेसची खरी ताकद आजचा युवक आहे* *. संतोषसिंह रावत* *ग्रामीण व शहर युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संतोषसिंह रावत यांनी दिले नियुक्तीपत्र*

*मुलमध्ये युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी*

*काँग्रेसची खरी ताकद आजचा युवक आहे* *. संतोषसिंह रावत* *ग्रामीण व शहर युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संतोषसिंह रावत यांनी दिले नियुक्तीपत्र*

मुल – काँग्रेस पक्षाची खरी आजचा युवक असून संघटनात्मक ताकद तळागाळात अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने युवक काँग्रेस तालुका मुल ग्रामीण व शहराची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
युवकांनी पक्ष संघटनेत सक्रिय सहभाग देत त्यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
काँग्रेस कार्यालय, मुल येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार व युवक काँग्रेस शहराध्यक्ष मिथुन सिंग पटवा यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना संघटित करून आजच्या युवा पिढीच्या हातात सूत्रे दिल्यास आपल्या ताकदीने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व बेरोजगार युवक युवती युवकांच्या हक्कासाठी प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला सभापती राकेश रत्नावार, उपाध्यक्ष नगरपरिषद मुल, सुनिल शेरकी शहराध्यक्ष, आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, प्रशांत उराडे, नगर सेवक विवेक मुत्यालवार, अतुल गोवर्धन, विलास कागदेलवार, राहुल प्रेमलवार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत युवकांची मजबूत फळी उभी करून काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आगामी काळात युवकांच्या संघटनात्मक सहभागातून मुल तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत व गतिमान करण्यासाठी नवीन कार्यकारिणी सक्रियपणे काम करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News