Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल तालुक्यात गेल्या ३० वर्षापासून शेत पांदण रस्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. काही गावात...

मूल तालुक्यात गेल्या ३० वर्षापासून शेत पांदण रस्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. काही गावात पांदण रस्तेच नाही

*शेत पांदण रस्ते होणार की, नाही शेतकरी शेतात जाणार कसे. *३० वर्षापासून मागणी करूनही अंतरगाव गोंडी विहिरगाव शेत पांदण रस्ता झाला नाही* मूल – शेतीचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शेतीला जोडणाऱ्या शेत पांदण रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे.ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्या क्षेत्राचे आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य यांची असते. याच हेतूने शासनाने चंद्रपूर जिल्हा परिषद पांदण रस्त्यांची १०० टक्के पूर्तता करणारा ठराव पारित केला आहे. “*परंतु नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या पांदण रस्त्याचे काम जिल्हा परिषद करू शकत नाही. कारण जिल्हा परिषद ग्रामीण विकासासाठी आहे.तर नगर परिषद फक्त त्याच शहरासाठी काम करणारी यंत्रणा आहे.त्यामुळे मूल नगर परिषद क्षेत्रात येणारे पांदण रस्ते गेल्या ३० वर्षापासून अजूनही रेंगाळले आहे.करिता मूल शहरात समाविष्ट असलेल्या अंतरगाव पारडवाही व गोंडी विहिरगाव साजातील पांदण रस्ता होऊ शकला नाही ही शासनप्रती व क्षेत्राच्या लोक प्रतिनिधीप्रती शोकांतिका असल्याचे संबंधित रस्त्याच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून “आमचा वाली कोण”? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंतरगाव पारडवाही व गोंडी विहिरगाव शेत रस्ता करण्याची विनंती अनेक शेतकऱ्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे केली. असता ” न.प.क्षेत्रात पांदण रस्त्याची योजना त्वरित सुरु करण्यात यावी शासकीय निधीमधून रस्ते बांधून देण्याचे जाहीर केले असताना,दुसरीकडे शासनाच्या मनरेगा नागपूर विभागीय आयुक्त यांचे निर्देशानुसार रोहयो उपजिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या निगडीत कोणत्याही प्रकारची कुशल कामे करता येणार नाही असे आदेश निर्गमित केले. त्यामुळे न.प. क्षेत्रातील कोणतेही पांदण शेत रस्त्याचे काम सुरु झाले नाही*”
महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुलभ रस्ते सुविधा उपलब्ध व्हावी,या उद्देशाने राबविण्यात येत असलेली मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता योजना सुरु केली.त्यात शासकीय यंत्रणेकडून प्राप्त माहिती नुसार १७ की.मी.२ कामे सुरु असून १० कामे पूर्णा वस्थेत तर ५ कामे अजूनही सूरु करण्यात आलेले नाही. बळीराजा शेत पांदण ४० की.मी. असून २५ कामे पूर्ण तर ५ कामे अजूनही सूरु झालेले नाही. ३ कामे दुसऱ्या योजनेतून करण्यात आल्याचे कळविले आहे. मात्र तालुक्यात अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे वादग्रस्त ठरत आहे. तालुक्यात अनेक पांदण रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ झालेला नाही. आणि अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

*चिरोली – खालवासपेठ रस्त्याची अवदशा* ग्रामपंचायत स्तरावर रस्ते मंजूर असून एका पांदण रस्त्यावर साधारणत १८ ते २४ लाख रुपये खर्च होत असतानाही अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले असून टाकलेले पाईप फुटून गेल्याने शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचे आले आहे.काम हे निकृष्ट दर्जाचे दिसून येत असून कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे. *शेतकरी खालवसपेठ*
*राजोली येथील बळीराजा योजनेतील पांदण रस्ते अपूर्णावस्थेत*.
१) शेतकऱ्यांना दर शेती हंगमात भेडसावणारी प्रमुख समस्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची आहे. राजोली येथील दिलीप शेंडे यांचे घरापासून तर तलाव पाण्याच्या नहर पर्यंतचा शेत रस्ता झालेला नाही. २) डॉ. रेवणवार यांचे घरापासून सिंदेवाही कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंतचे खडीकरणाचे काम झालेले नाही. *जितेंद्र लोणारे सरपंच राजोली*. मूल तालुक्यातील मौजा नवेगाव (भूजला) एकही पांदण रस्ता घेतलेला नाही. प्रशासनाने नियोजन करुन काम सुरु करावे अशी मागणी *माजी सरपंच सूमीत आरेकर यांनी केले आहे* बोंडाळा रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरु आहे. जुनासुरला चांदापूर रस्त्याच्या काम सुरु करण्यात आले आहे. जानाळा – शेत पांदण रस्ते असून वनविभागाच्या अतिक्रमणामुळे अडून पडले आहेत. “आगळी व फुलझरी या दोन्ही गावात शेत रस्ते मजूर असून एकाही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही”. *धनराज रामटेके सदस्य* *खेडी ते नदीकडे जाणारा पांदण रस्त्याचे काम अपूर्णच* मुख्य गडचिरोली कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून चीमढा नदीकडे जाणाऱ्या शेत पांदण रस्त्याची अनेक वर्षापासून अवदशा झाली आहे. त्याचं रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकण्यात आला असून खडीकरणाचा पत्ताच नाही. शेतकऱ्यांसाठी नेहमी चिखलाचे साम्राज्य असते. बैल बंडी ट्रॅक्टर सुद्धा नेणे कठीण होत. या रस्त्यावर त्वरित खडीकरण करण्यात यावे. व लागून असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. *सुधाकर गेडाम/ सुरेश अल्लुरवार शेतकरी*

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News