Sunday, August 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीपी ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करा; अन्यथा काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा* *संतोषशिंह रावत*....

डीपी ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करा; अन्यथा काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा* *संतोषशिंह रावत*. (*डी.पी.बंद पडल्यामुळे १० गावचे धान उत्पन्न मरणार*)

*डीपी ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करा; अन्यथा काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा* *संतोषशिंह रावत*. (*डी.पी.बंद पडल्यामुळे १० गावचे धान उत्पन्न मरणार*)
मूल – मूल विद्युत (महावितरण) उपविभागातील अनेक गावांमध्ये कृषी वीज पुरवठा करणारे डीपी ट्रान्सफॉर्मर गेल्या १२ दिवसापासून बंद पडल्याने धान पिकाला पाणी देण्यासाठी लावलेले सिंचन मोटारपंप ठप्प पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, बंद डीपी तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषशिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका काँग्रेस कमिटी तर्फे महावितरण मूल च्या अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
मंगळवारी दि. १४.७.२०२६ रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मूल तालुक्यात धान हे प्रमुख पीक असून जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांनी धानाची पेरणी पूर्ण केली आहे. पिकाची उगवण झाल्याने आता तातडीने पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्रमहावितरणच्या मूल उपविभागांतर्गत येणाऱ्या मौजा नवेगाव(भूजला) कुरुड, तुकूम, कोसंबी, राजोली, चिमढा, भादुर्णी, चिरोली, टेकाडी, चिचाळा आदी गावांतील कृषी वीज पुरवठ्याचे डीपी ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे सिंचन पूर्णपणे ठप्प झाले आहे.
काही शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा पेरणी केली असून अनेकांनी नुकतीच पेरणी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत पावसानेही दडी मारल्याने धान पिकाला पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. डी.पी.बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महावितरणने संबंधित गावांतील बंद डीपी ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून कृषी वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, जिल्हा महासचिव व अध्यक्ष घनश्याम येनुरकर, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटी मूल, सोसायटी उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका चंदा ताई कांमडी, माजी सरपंच विनोद कांमडी, संचालक रामदेव गोहणे, धनराज रामटेके, काँग्रेस पदाधिकारी गंगाधर कुंनघाडकर,शहर उपाध्यक्ष कैलास चलाख,लिलाधर गुरनुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाची प्रत मां.अधीक्षक अभियंता महावितरण चंद्रपूर यांनाही ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News