Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*कन्हेरे फाऊंडेशन तर्फे* *पिपळा ( केवळ राम) नरखेड येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे...

*कन्हेरे फाऊंडेशन तर्फे* *पिपळा ( केवळ राम) नरखेड येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप* *स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना आनंद*

*कन्हेरे फाऊंडेशन तर्फे*
*पिपळा ( केवळ राम) नरखेड येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप*
*स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना आनंद*
मूल – आतापर्यंत पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; विद्यार्थ्यांना सुरक्षा व शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन

कन्हेरे फाऊंडेशन नागपूरच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिपळा (केवळराम), नरखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोरभाऊ कन्हेरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपळा ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीपराव चांदूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नरखेड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मंगला मोकासे उपस्थित होत्या. तसेच कन्हेरे फाऊंडेशनचे सहसचिव श्याम चौधरी, नागपूर जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष विजय नाडेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जमाती विभागाचे सचिव राजेश रंगारी, झिरो माईल फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष आनंद शर्मा, पिपळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेवरावजी तांदूळकर, सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधरजी सातपुते, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर अली शेख, प्रफुल्लराव वाढबुद्धे, स्वप्नील वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय नाडेकर यांनी केले. यावेळी कन्हेरे फाऊंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती देताना श्याम चौधरी यांनी सांगितले की, फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बॅगचे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचे कार्य फाऊंडेशन सातत्याने करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मंगला मोकासे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, अनोळखी व्यक्तींपासून सावध कसे राहावे तसेच अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत कशी घ्यावी, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

आनंद शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दिलीपराव चांदूरकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कन्हेरे फाऊंडेशनचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक व आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी गायकवाड यांनी केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रिया निखिल खोपे, शेषराव घुगल, वसंतराव बारमासे, शब्बीर अली, सोमनाथ दुरुगकर, सुरेश जांभळे, स्वप्नील वाडकर, पांडुरंग चरपे, दीपक बावने, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच पिपळा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन शालेय बॅग मिळाल्याचा आनंद दिसून येत होता. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कन्हेरे फाऊंडेशनकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी स्वागत केले.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News