*पोळ्याच्या सणात शेतकऱ्यांवर संकट* *पाण्या अभावी रोवने वाळले, आवत्या पिवळे पडून करपले, हलके धान मेले, शेतकरी पुन्हा हवालदिल झाले* *शासनाने तात्काळ सर्व्हे करा व *मूल – सावली – तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा*. *संतोषशिंह रावत यांची मागणी*
(जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, सर्वांना अन्न देणारा शेतकरी, स्वतः उपाशी राहून गोर गरीबांची भूक भागविणारा शेतकऱ्यांवर ऐन पोळ्याच्या सणात संकटात सापडला आहे. हे शासनाला,प्रशासनाला का? दिसत नाही.)
मूल – नुकतेच खरीप पिकांचे रोवणी झाली, काहींची पाणी नसल्याने काही शेतकरी अडले आहेत. आवत्या धान पूर्णपणे पिवळा पळून करपले आहे. अतिउष्णतेमुळे धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हलके धान मेले. मूल, सावली, पोभुर्णा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले. शेतकऱ्यांची सद्यस्थिती बिकट झाली आहे. तेव्हा शासनाने व सत्ताधारी राज्यकर्त्याने, प्रशासकीय यंत्रणेने कुठलीही आणेवारी गृहीत न धरता आताची वेळ लक्षात घेऊन शासनाने मूल- सावली – पोभुर्णा तालुक्यातील शेतीचा सर्व्हे करून त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,माजी अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केली. असून, जिल्हाधिकारी व शासनाच्या कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सत्यता जाणून सर्वे करावे.व तसा अहवाल मान.मुख्यमंत्री,व कृषिमंत्री यांना तात्काळ सादर करावे अशी मागणी सुद्धा केली आहे.
यावर्षी सुरवाती पासूनच पावसाच्या लहरीपना अनियमिततेमुळे पाणी नाही. तिन्ही तालुक्यातील शेती पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे तसेच निंदा व मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र अपेक्षित पाऊस न मिळाल्याने अनेक भागांतील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांची आर्थिक चिंता वाढली आहे.
शासनाने मूल व पोभुर्णा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अत्यावशक सिंचनाची सोय केली नाही, शासन व प्रशासनाने तिन्ही तालुक्यातील पाऊस, पिकांची सद्यस्थिती, संभाव्य उत्पादन घट आणि नुकसान यांचे तातडीने सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा. दुष्काळाचे निकष पूर्ण करणाऱ्या भागांना कोणताही विलंब न करता दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक मदत उपलब्ध करून
द्यावी, अशी मागणी सुद्धा रावत यांनी केली.
*सरसकट कर्जमाफी नाही, आधारभूत नोंदणीचे पैसे नाही, प्रोत्साहन अनुदान नाही*
शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई,पीक विम्याचा लाभ, आधारभूत बोनस, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफी, प्रोत्साहन अनुदान कुठलाही उशीर न लावता आर्थिक मदत जाहीर करावी, वीजबिलामध्ये सवलत द्यावी, तसेच आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून खरीप हंगामाची तयारी केली आहे. शेतीला सिंचनाची पुरेशी सोय नाही, नदी नाले कोरडे पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू नये यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेत मूल – सावली – पोभुर्णा तालुक्याची वस्तुनिष्ठ पाहणी करून दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची प्रक्रिया तातडीने करावी अशी मागणी संतोषशिंह रावत यांनी केली आहे. *शासन प्रशासन झोपेत*. अती उष्णतेमुळे धान पिकांचे काय हाल आहेत.याची जिल्हा प्रशासनाला जाग का,येत नाही. शासन तात्काळ पिकांचे सर्व्हेक्षण का,करीत नाही. त्वरित नुकसान भरपाई,का, देत नाही. असा प्रश्न शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे.




