*सिमेंट कंक्रेट रोडचे सुरु असलेल्या जाणाडा कांतापेठ अर्धवट नाली बांधकामामुळे सांडपाणी थेट शिरतेय नागरिकांच्या घरात !*
*कोट्यवधी रुपये खर्च होत असलेले बांधकाम निकृष्ठ व नागरिकांना त्रास देणारा*
मूल- जाणाळा पासून सुरु झालेल्या पोंभुर्णा मार्गावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता व नाली बांधकाम जोमाने सुरू असल्याचा दावा केला जात असताना, जाणाळा – कांतापेठ या दोन्ही गावातून या रस्त्याचे काम करण्यात आले असून रस्त्याला लागून असलेले नालीचे बांधकाम नागरिकांच्या घरासमोरूनच त्यांच्या अंगणापासून तीन ते चार फूट उंच करण्यात आल्याने जाणाळा येथील माजी सरपंच यांच्या यांचा मुख्य रस्ताच बंद झाला असून रस्त्यावरील पाणी सरळ नागरिकांच्या घरात घुसणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात याचा मोठा फटका नागरिकांना बसनार आहे. मागील सहा महिन्यांपासून नालीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत सोडल्याने सांडपाणी थेट लोकांच्या घरात शिरत असून, परिसरात दुर्गधी व आजारांचे साम्राज्य पसरले आहे.
- तसेच कांतापेठ रस्त्याच्या कडेला नालीचे काम अर्धवट असल्याने रस्ता पूर्ण न झाल्याने व नागरिकांच्या घराच्या दरवाज्यासमोरच खड्डा पडल्याने खाद्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे,वाहनधारकांचे किरकोळ अपघात घडत आहेत. वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा भाग अक्षरशः ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहे. स्थानिकांनी अनेकदा याबाबत संबंधितांकडे तक्रारी केल्या. मात्र, कंत्राटदाराच्या मनमानीपुढे प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या एका बाजूला नाली झाली. मात्र, घरांच्या बाजूला काम का थांबवले?नालीच्या अर्धवट कामामुळे रस्त्याच्या कडेला धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. रात्रीच्या वेळी या
कांतापेठ परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नालीचे काम होणे गरजेचे होते. मात्र, घरांच्या बाजूला काम अर्धवट सोडल्याने घाण पाणी थेट घरात शिरत आहे. वारंवार सांगूनही कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केले. जर तत्काळ हे काम पूर्ण झाले नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे
लागेल. तसेच करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम करतांना गावातील लोक प्रतिनिधींना किंवा नागरिकांना कंत्राटदाराने व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या इंजिनिअरने विश्वासात घेतले नाही. त्यातले नालीचे बांधकाम चुकीचे झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. कांतापेठ रस्त्याला लागूनच ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा असल्याने नालीचे बांधकाम तीन फूट उंच झाल्याने लहान मुलान देखील नाली ओलांडून जाणे अवघड झाले आले. याच उंचावलेल्या नालीमुळे पाऊसाचे पाणी व नागरिकांचे सांडपाणी हे नालीत न जाता उलट नागरिकांच्या घरात घुसणार आहे. अशी परिस्थिती प्रत्यक्षपणे दिसून येत आहे. *वैशाली निकोडे, सरपंच, टोलेवाही* कांतापेटच्या पेढेही याही पेक्षा सिमेंट रस्त्याचे काम बरोबर झाले नसल्याचे नागरिकांनी आमच्या प्रतिनिधजवळ बोलून दाखविले आहे.




