*मूल तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय पडोळे,उपाध्यक्ष गुरु गुरनुले व सचिवपदी भोजराज गोवर्धन यांची अविरोध निवड*. मूल – सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन सामाजिक व प्रशासकीय हीत जोपासण्यात सदैव अग्रेसर असलेल्या मूल तालुका पत्रकार संघाची सभा दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार संघाच्या कार्यालयात अध्यक्ष राजू गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यात विषय सूचीनुसार मूल तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणीची निवड करणे यावर चर्चा करुन पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनुभवी व कर्तव्यदक्ष पत्रकार संजय पडोळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणारे ज्येष्ठ अनुभवी पत्रकार गुरु गुरनुले यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तर सचिव पदावर युवा पत्रकार भोजराज गोवर्धन यांची निवड करण्यात आली असून सहसचिव पदी रमेश माहुरपवार, तर कोषाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी ज्येष्ठ, अनुभवी पत्रकार प्रा.चंद्रकांत मणियार यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पत्रकार संघाच्या सन्माननीय सदस्यांचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. सभेच्या अध्यक्ष राजू गेडाम यांनी मनोगत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघाच्या कार्यक्रमात पत्रकार राजू गेडाम, विनायक रेकलवार, युवराज चावरे, दीपक देशपांडे, रवी बोकारे, अशोक येरमे, गंगाधर कुनघाडकर, विजय पाकमोडे, वासुदेव आगळे उपस्थित होते.सभेचे आभार विनायक रेकलवार यांनी मानले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.




