*मूल तालूक्यातील गॅस सिलेंडर ग्राहक धारकांची सिलेंडरसाठी तारांबळ ओटीपो येऊनहीं सिलेंडर मिळत नाही*
*मूल तालुक्यातच ४५ दिवसाची अट का? २५ दिवसातच सिलेंडर द्या. संतोषसिंह रावत यांची जिल्हाधिकारी यांचेकडे केली मागणी*
मूल – मूल तालूका धानाची बाजारपेठ म्हणून परिचीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे मूळ गाव व तालुका. तसेच माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा विधानसभा क्षेत्र असून तालुक्यात 106 गावांचा समावेश असलेल्या मूल तालुक्यात 49 ग्रामपंचायती आणि 1 नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, असून तालूक्याची लोकसंख्या 1.50 लाखाचे वर आहे. तालूक्यात शासनाचे सर्व कार्यालये, उच्चशिक्षण संस्था, उपजिल्हा रुग्नालय, औद्योगीक वसाहत कृषी महाविद्यालय या ठिकाणी कार्यान्वीत आहेत. मूल तालूक्यात आजस्थितीत 25 हजाराचे वर गॅस वापरणारे कुटूंब आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजना व शासनाच्या अन्य योजना अंतर्गत मोफत आणि अनुदान तत्वावर गॅस वापरणारे दारीद्रय रेषेखालील गरीब कुटूंबही तालूक्यात मोठया संख्येने आहे. असे असतांना मूल शहरातील व तालुक्यातील गॅस ग्राहकांना सिलेंडरसाठी वाट पहायची पाळी येत असेल तर नगरातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
तालूक्यातील व मूल शहरातील नागरीकांच्या मागणीनुसार आपल्या प्रयत्नाने मुल शहरातील बंद असलेली गॅस एजन्सी सुरु झाली आहे. परंतू मूल शहरासाठी 25 दिवस व ग्रामीण साठी 45 दिवसात गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्यांत येईल असे सांगीतले आहे. परंतू फक्त महानगरपालीका शहरीकरणात येत येत असून मुल शहर हे ग्रामीण मध्येच येत असल्याने मूल शहरातील ग्राहकांना 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शहरातील ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली आहे. अनेकांना घरी गॅस सिलेंडर असून सुध्दा चुल काडयावर स्वयंपाक करण्याची पाळी आली आहे. करीता मूल शहरात 25 दिवसातच गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देवून गॅस धारक ग्राहकांची अडचण दूर करावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव,माजी जी.प.अध्यक्ष व माजी अध्यक्ष विद्यमान संचालक सी.डी.सी.सी.बँक संतोषशिंह रावत यांनी एका लेखी निवेदनाद्वारे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
सदर मागणीचा गांर्भीयाने विचार करुन सहकार्य करावे. अन्यथा संभाव्य परिस्थ्तिीला प्रशासन आणि कंपनी प्रशसनाच्या विरोधात गॅस ग्राहक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.? याबाबत सहानुभुतीपुर्वक गॅस धारकांचा विचार करुन 25 दिवसात गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्यांस आपल्या स्तरावरुन प्रयत्न करावा, यासाठी गॅस ग्राहकांच्या वतीने संतोष सिंह रावत यांनी मागणी केली असून निवेदनाची प्रत
मा.ना.पालकमंत्री साहेब, चंद्रपूर व मान. आमदार विजय वडेटटीवार विधीमंडळ गटनेते, विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र राज्य. मुंबई यांनाही त्वरित कार्यवाहीसाठी दिले आहे.





