*एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगच्या नियमांत बदल २५ दिवसात मिळणार गॅस सिलेंडर*
*केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा निर्णय*
*प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांच्या मागणीला यश*
मूल – एच.पी. गॅस सिलेंडरची समस्या ग्रामीण व नगर परिषद क्षेत्रातील ग्राहकांना सारखी भेडसावत होती. बुकिंग केल्यानंतरही ओटीपी येऊन देखील ग्राहकांना सिलेंडर मिळत नव्हता. संपूर्ण ग्राहक त्रासले होते. गॅस ग्राहकांच्या समस्येची मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी उचलून धरत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदन देऊन लाऊन धरली असता, सर्वदेशातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगच्या कालावधीत मोठी सवलत देण्यात आली असून, आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील ग्राहकांसाठी ४५ दिवसाचा कालावधी कमी करून २५ दिवसांचा समान बुकिंग कालावधी लागू करण्यात आला असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज केली.सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली. तेल विपणन कंपन्यांना या सुधारित नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दिनांक ९ सप्टेंबर २०२६ च्या सकाळ पासून लागू होईल अशी माहिती प्रशासनाकडून व गॅस एजन्सी धारकाकडून मिळाली आहे.
*ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा*
केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील एलपीजीचा गॅस पुरवठा सुरळीत .बुकिंग कालावधी कमी करून तो २५ दिवसांवर आणला असल्याने संतोषशिंह रावत यांनी ग्राहकांची महत्वाची मागणी लाऊन धरल्याने गॅस धारकांनी आभार मानत समाधान व्यक्त करीत आहेत.




