Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*वन विभागात वनमजूर म्हणून स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे* *संतोषसिंह रावत यांची मागणी*

*वन विभागात वनमजूर म्हणून स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे* *संतोषसिंह रावत यांची मागणी*

*वन विभागात वनमजूर म्हणून स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे*
*संतोषसिंह रावत यांची मागणी*

मूल : वन विभागाच्या विविध कामांसाठी बाहेरील मजुरांना कामावर घेण्याऐवजी स्थानिक ग्रामीण बेरोजगार युवक आणि गरजु लोकांना वनमजूर म्हणून प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिह रावत यांनी केली आहे.

वन विभागांतर्गत दरवर्षी वृक्ष लागवड, जंगल संरक्षण, वन्यजीव गणना, आग प्रतिबंधक रेषा (फायर लाईन) आणि रोपवाटिका व्यवस्थापन अशी अनेक कामे केली जातात. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. मात्र, अनेकदा ठेकेदारांकडून बाहेरील भागातून किंवा इतर गावातील लोंकाना मजूर म्हणुन आणले जातात, त्यामुळे स्थानिकांना रोजगारापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ज्या गावांच्या शेजारी जंगल आहे, त्या गावातील लोकच जंगलाचे खरे रक्षक आहेत. त्यांना रोजगार मिळाला तर ते अधिक निष्ठेने जंगलाचे संरक्षण करतील. शिवाय वनऔषधी, वनमार्ग आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीची त्यांना पूर्ण माहिती असते. त्यामुळे वन विभागाने स्थानिकांना न डावलता लगतच्या गावातील बेरोजगार युवक आणि गरजु लोकांना वन मजूर म्हणुन कामावर घेऊन त्यांना सहकार्य करावे. अशी विनंती संतोसिह रावत यांनी केली आहे. वन विभागाने तात्काळ या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि प्रत्येक परिक्षेत्रात किमान ८० टक्के वनमजूर हे स्थानिक असतील याची अंमलबजावणी करावी. अन्यथा गावगावात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतोषसिंह रावत यांनी दिला आहे. वाघाने ठार केलेल्या *कुटुंबियांच्या पाल्यांना नोकरीत त्वरित घ्यावे* चंद्रपूर जिल्ह्यात, मूल, सावली, पोभुर्णा, सिंदेवाही,बल्लारपूर ब्रम्हपुरी,नागभीड तालुक्यात वाघाने ठार केलेल्या घटना घडल्या आहे. अनेकांचे कुटुंब निराधार झाले. त्यांच्या घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने अशा कुटुंबाचा आधारच शासन असते. त्यांच्या पाल्यांना तत्काळ नोकरीची गरज असते. परंतु फक्त त्या कुटुंबांना तात्पुरते आर्थिक सहाय्य देऊन प्रशासन वेळ मारून नेत आहे असे निदर्शनास आले आहे. परंतु तसे चालणार नाही तर त्यांच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार वनविभागात स्थायी नोकरी देण्याची गरज आहे. तेव्हा घटना झाल्या बरोबर तीन महिन्यात त्यांना नोकरीत समाविष्ट करुन घाणे. अशी मागणी संतोषशिंह रावत यांनी केली आहे.
रावत यांच्या मागणीला स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News