*एस.आय.आर.अभियान यशस्वी करण्यासाठी काँग्रेस तालुका, शहर, सर्व नवनियुक्त सेलचे पदाधिकारी व ग्रामस्थानी सहकार्य करावे* *SIR पूर्ण केले तरच, शासकीय योजनांचा लाभ मिळेल*
*संतोषसिंह रावत यांचे आवाहन*
मूल – लोकशाहीचा पाया मजबुत ठेवण्यासाठी मतदार यादी अचूक, पारदर्शक व संघटनात्मक नियोजन बूथथस्तरीय बळकटी समन्वय अद्ययावत असणे पक्ष संघटनेसाठी आवश्यक असुन भविष्यात मतदारांनाही सर्व सुरु असलेल्या शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (एस.आय.आर.) अभियान सुरू केले आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी पात्र नागरिकांनी प्रत्यक्ष बी.एल.ओ. सोबत सहभागी होवून प्रत्येकाकडून फॉर्म भरून घ्यावे आणि सहकार्य करावे. असे आवाहन काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी केले आहे.
लोकशाही प्रधान भारतात निवडणुक प्रक्रिया राबवितांना मतदानाचे प्रत्यक्ष दिवशी नांव, वय, वार्ड आदि कारणांमूळे मतदारांमध्यें गोंधळ निर्माण होवुन मतदार यादीत नांव नसल्याचे कारणावरून संबंधीत मतदार मतदानापासून वंचित राहतो. यासाठी मतदार आपली जबाबदारी विसरून त्यावेळी शासनाला जबाबदार ठरवुन मोकळा होतो. ही परिस्थिती लक्षात घेवून प्रत्येक नागरीकाला मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावत येवून निवडणुक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासपुर्ण झाली पाहिजे. हा उद्देश समोर ठेवुन निवडणुक आयोगाने एस.आय.आर. अभियान सुरू केले आहे. निवडणुक आयोगामार्फत राबविण्यांत येत असलेल्या या अभियानात आपल्या गावातील,आपल्या वार्डातील कोण मतदार आहे. त्याची ओळख पटऊन घ्यावी व मतदारांनी सुद्धा कोणताही भेदभाव न करता सहकार्य केले पाहिजे. भविष्यातला वेध घेवुन आपल्या नांवाची मतदार यादीत पडताळणी करावी, आपले नांव, वय, पत्ता यादी अचुक नोंद असल्याची खात्री करावी. चुकीची नोंद असल्यास दुरूस्ती संबंधी किंवा बदलाच्या नोंदी विषयी दारी आलेल्या कर्मचा-यास सुचीत करून लोकशाहीचा पाया मजबुत करण्यासाठी सहकार्य करणे प्रत्येक नागरीकांची जबाबदारी आहे. आयोगाच्या अभियानाची माहिती आपले नातेवाईक, मित्र मंडळी आणि निरक्षर व्यक्तींना देवून त्यांनाही एस.आय.आर. अभियानात सहभागी करून घेण्यासाठी स्वयःस्फुर्तीने सहकार्य करून नागरीकत्वाचे कर्तव्य पार पाडावे. असेही आवाहन संतोषसिंह रावत यांनी केले आहे. सदर अभियाना विषयी तक्रार किंवा समस्या असल्यास तहसिल कार्यालयातील निवडणुक विभागाशी किंवा कोणत्याही राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधुन मतदार यादीत अचुक नांवाची नोंद करून घ्यावी.अशी विनंतीही संतोषसिंह रावत यांनी केली आहे. *एस.आर.आय. करुन घेतल्यास शासकीय योजनाचा लाभ घेण्यास अडचण जाणार नाही*. (SIR) मतदार यादीचे सखोल पुनर्निरीक्षण करुन घेतल्यास निराधारांसाठी सूरु असलेल्या शासनाच्या संजय गांधी निराधार योजना,वृद्धापकाळ निराधार योजना,श्रावणबाळ योजना,लाडकी बहीण योजना,सर्व प्रकारच्या घरकुल योजना,आणि शासनाच्या कोणत्याही आकस्मिक मदत योजनांचा लाभ मिळण्यास अडचण जाणार नाही.करिता या अभियानाला प्रत्येकांनी सहकार्य करावे व इतरांनाही सहकार्य करण्यास सांगावे असे आव्हान संतोषशिंह रावत यांनी केले आहे.





